‘झुंड’ : प्रयोग म्हणून हे नाटक प्रभाव टाकतं, परिणाम साधतं, जिथं पोहचायला हवं ती उंची पार करतं.
आजच्या अस्थिर आणि अराजकाच्या वेळी व्यवस्थेचा टोकदार शब्दांत निषेध करताना समर खडस यांनी मराठी नाटकाची परिभाषा, चौकट, आखाडे मोडलेत. आज आपल्यावर सतत पाळत ठेवली जातेय. आपलं बोलणं सतत कोणीतरी चोरून ऐकतंय. आपलं उठणंबसणं, खानपान, राहणं, एकमेकांत मिसळणं, आपण काय वाचतोय वा लिहितोय याच्या नोंदी ठेवल्या जाताएत. आपल्याकडून सोयीचं लिहून घेण्याचा अट्टहास आहे. आपण काय खावं हेही एक जमात ठरवू पाहत आहे.......